vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे  यांच्या समर्थनार्थ काही संघटना समोर…..

NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे  यांच्या समर्थनार्थ काही संघटना समोर…..

मुंबई: प्रतिनिधी   वेगवेगळ्या आरोपांमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे  यांच्या समर्थनार्थ काही संघटना समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक  दररोज पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांचं व्यक्तीगत आयुष्य, जात, धर्म यावर मलिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ एनसीबी कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला. नवाब मलिक यांचा निषेध केला. समीर वानखेडे आपल्या कार्यालयात जात असताना शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं व सत्कार केला. त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

“समीर वीनखेडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही नवाब मलिक यांचा निषेध करतो. युवा पिढीला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय. त्याला साथ दिली पाहिजे, समीर वानखेडे तुम्ही आरोपांकडे दुर्लक्ष करा. ड्रग्ज रॅकेटचा पदार्फाश करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत” असं शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं.

संबंधित पोस्ट

क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राहुल गांधी यांची संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत भजन, कीर्तन; संत रविदास मंदिरात पूजाही केली

vishwatmaklokswamivarta

घरकुल बांधकामासाठी मोठा निर्णय भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान;

vishwatmaklokswamivarta

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

vishwatmaklokswamivarta

पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार—महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta