vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

त्रिपुरातील निवडणुकीत सत्ताधारी भाजपनं 334 जागांपैकी 112 जागा बिनविरोध जिंकल्या…

त्रिपुरातील निवडणुकीत सत्ताधारी भाजपनं 334 जागांपैकी 112 जागा बिनविरोध जिंकल्या….

त्रिपुरा प्रतिनिधी   : त्रिपुरातील निवडणुकीत  सत्ताधारी भाजपनं (BJP) 334 जागांपैकी 112 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता, तर छाननीसाठी 5 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, विरोधी सीपीआय (एम), तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) चार, काँग्रेस आठ, एआयएफबीचे दोन आणि सात अपक्षांसह 36 उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज मागे घेतले. उर्वरित 222 जागांसाठी एकूण 785 उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

राज्यभरातील आगरतला महानगरपालिका (प्रभाग 51), 13 नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायतींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 334 जागा आहेत. यात अंबासा नगरपरिषद, जिरानिया नगरपंचायत, मोहनपूर नगरपरिषद, राणीबाजार नगरपरिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतीरबाजार नगरपरिषद या सात नगरपरिषदांमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवारच नाहीत, त्यामुळं भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.

माकपचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी आरोप केलाय, की भाजपच्या गुंडगिरीमुळं आमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले असून पाच नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींमध्ये आमच्या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही, असं त्यांनी सांगितलं. त्रिपुरामध्ये आपला पाया वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टीएमसीनं उत्तर-पूर्व राज्यात नागरी निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलंय. महापालिका निवडणुकीत एकूण 5,94,772 मतदार मतदानासाठी पात्र असून शहरी भागातील पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

संबंधित पोस्ट

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळानिविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशØ ६३५ चौ.फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिकाØ सदनिकाधारकाला वाहन पार्किंगची सुविधा

vishwatmaklokswamivarta

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार

राष्ट्रवादी पार्टीचे नेते अजित पवार ईडीच्या रडारावर? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा- मंत्री अतुल सावे

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नस्तीवर स्वाक्षरी केल्याची चर्चा

vishwatmaklokswamivarta

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू ,उमेद्च्या वतीने जानकी वस्तूचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी  ना. खा. केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta