vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आपल्यातून निघून गेला,नाना पाटेकर यांच्या अकाली निधनावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला शोक

माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आपल्यातून निघून गेला,नाना पाटेकर यांच्या अकाली निधनावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला शोक

बुलढाणा, प्रतिनिधी :पडद्यावरील भूमिकांमधून असंख्य मनांना स्पर्श करणारा आणि पडद्याबाहेरही माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता नाना पाटेकर हे आज आपल्यातून निघून गेले आहे. अशी दुःखद प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे

अभिनयाची ताकद आणि माणुसकीची ऊब यांचा सुंदर संगम म्हणजे नाना पाटेकर. शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले कार्य त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देत राहील.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविणारा नट म्हणून नाना पाटेकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली स्पष्टवक्ता, परखडपणा, बेधडकपणा हा त्यांचा स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारा ठरला. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ हा त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास प्रवासात एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली . ती प्रतिमा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपली नाना आज आपल्याला सर्वांना अचानक सोडून निघून गेले.

माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आपल्यातून निघून गेलाय. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शोक संवेदना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.

0000

संबंधित पोस्ट

एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”*

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी

आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन*

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…