vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ पाणी वापराबाबत पालकमंत्री यांनी घेतला आढावा

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ पाणी वापराबाबत पालकमंत्री यांनी घेतला आढावा..

हिंगोली, प्रतिनिधी : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत संभाव्य पाणी, चारा टंचाईच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करा. प्रत्येक गावागावात पाणी वापराच्या काटकसरीबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनास केल्या.पालकमंत्री झिरवाळ यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणी, चारा आदींचा आढावा घेतला. श्री. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड,पूर्णा पाटबंधारे विभाग वसमतचे कार्यकारी अभियंता आर.पी. गरुड, जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके, हिंगोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे राजू नरवाडे आदींची उपस्थिती होती. यांसह उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार, जिल्ह्यातील इतर सर्व मुख्याधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करावे. पिण्याच्या पाण्याीच सुनिश्च‍ितता करून योग्य ती अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठ्याचे सन 2026-27 या वर्षातील धरणनिहाय, वापरनिहाय पाणी वापर नियोजन निकषानुसार अंतिम करावे.

प्रत्येक प्रमुख जलाशयाच्या उपलब्ध जिवंत साठ्यापैकी 10 टक्के अतिरिक्त बफर, आपत्कालीन साठा राखून ठेवणे, नागरी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पाणी वापरात 10 टक्के कपात करणे, गळती प्रतिबंधक मोहीम राबविणे, सांडपाणी पुनर्वापर, औद्योगिक वापरासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर, पिण्याचे पाणी, औद्योगिक आरक्षणानंतर शिल्लक पाण्यानुसार रब्बी हंगामी पिके, चारा पिकांसाठी सिंचन पाळी, आर्वतनाचे वेळापत्रक निश्च‍ित करणे आदी बाबींचाही आढावा पालकमंत्री झिरवाळ यांनी घेऊन योग्य त्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांना सादरीकरणाद्वारे दिली.

जिल्ह्यातील पाणी पातळीतील घट, प्रकल्पातील पाणी साठा, पाणी वापराचे नियोजन, अवैध पाणी उपशांवर केलेली कारवाई, दुष्काळाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी, चारा उपलब्धता आणि वैरण विकासाबाबतच्या उपाययोजना, जलसंवर्धन, जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे, जिल्ह्यात निर्माण करण्यात येणारी 30 हजार जलतारा प्रकल्पसाठे यांसह पाणी वापर आणि काटकसरीबाबत केलेल्या उपाययोजनांचीही माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनीही जिल्ह्यातील एकूण पाणी परिस्थतीचा सविस्तर आढावा सादर केला.

0000

संबंधित पोस्ट

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

चला… मराठीतच बोलू या!!

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’