vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

30, तपासणी अन् सल्ला’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात गती४९ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी; मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे निदान करून उपचारांवर भर

30, तपासणी अन् सल्ला’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात गती४९ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी; मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे निदान करून उपचारांवर भर

 

ठाणे, प्रतिनिधी परिषद, ठाणे) : राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ ही १०० दिवसीय विशेष आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान, नियमित आरोग्य तपासणी आणि निदान झालेल्या रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात मोहिमेसाठी ९५९ पथके कार्यरत असून, ३० वर्षांवरील ४९ हजार २५९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मधुमेह तपासणीअंतर्गत ४५ हजार १५९ नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी १ हजार ४७० नागरिकांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले असून, ४२३ जणांना मधुमेहाचे निदान झाले आहे.

उच्च रक्तदाबासाठी ४४ हजार ६३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५१० नागरिकांना पुढील तपासणीसाठी संदर्भित केले असून, ६१५ जणांना उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. यापैकी ५८३ रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

कर्करोगाचे लवकर निदान व्हावे, यासाठी ७८३ तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. गर्भाशय मुख कर्करोगासाठी ६३६ महिलांची तपासणी करून ३६ महिलांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले. मुख कर्करोगासाठी ३१ हजार ३८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८२ नागरिकांच्या तोंडात पांढरे चट्टे आढळल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले, तर सात जणांना निश्चित निदानासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. स्तन कर्करोगासाठी ९ हजार ६९३ महिलांची तपासणी करण्यात आली असून, ९९४ महिलांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

६० वर्षांवरील नागरिकांसाठी १ हजार ८१४ शिबिरे आयोजित करून १२ हजार ६१६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. संशयित मोतीबिंदू आढळलेल्या २५७ नागरिकांना पुढील तपासणी व उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे वेळीच निदान झाल्यास योग्य उपचारांद्वारे आरोग्यविषयक गुंतागुंत कमी करण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, आरोग्य विभागाच्या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार व पाठपुरावा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..

राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक दृष्टी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत चष्मेवाटप

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अ त्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार;

vishwatmaklokswamivarta