vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची धडक मोहीम; 4 हजार 100 रुपयांचा दंड वसूलअवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची धडक मोहीम; 4 हजार 100 रुपयांचा दंड वसूलअवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

 

जालना, प्रतिनिधी): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपरीधारकांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कारवाई केली. या मोहिमेत विविध कलमांनुसार 10 पानटपऱ्यांवर कारवाई करून एकूण 4 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी अंबड चौफुली परिसरात अवैधरित्या गुटखा, तंबाखू, मावा, जर्दा, खर्डा आणि सुट्ट्या सिगारेटची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत. पानटपरीधारकांनी कायद्याचे पालन करावे आणि अवैध तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शिवप्रसाद एखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास चेके तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदीप गोरे, सायकोलॉजिस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे आणि ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायके यांच्या सहभागातून करण्यात आली.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते कोलकाता येथे ‘स्वच्छ मोबाईल ॲप’चे भव्य लोकार्पण 🇮🇳📱🧹

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार

धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूरला स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलसह विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ याविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले

vishwatmaklokswamivarta

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले