vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 अंतर्गत आरोग्य सेवा क्षेत्रात मोफत प्रशिक्षणाची संधी जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 अंतर्गत आरोग्य सेवा क्षेत्रात मोफत प्रशिक्षणाची संधी जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन

      जालना, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 अंतर्गत जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विविध अभ्यासक्रमांद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे पॅलिएटिव्ह केअर असिस्टंट आणि डायबिटीज केअर असिस्टंट हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे जनरल ड्युटी असिस्टंट (ॲडव्हान्स्ड), होम हेल्थ एड, फ्रंटलाइन हेल्थ केअरगिव्हिंग असिस्टंट आणि जेरियाट्रिक केअरगिव्हर (इन्स्टिट्यूशनल व होमकेअर) हे चार अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना आरोग्य सेवा क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची तसेच शासनमान्य कौशल्य प्रमाणपत्र मिळविण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठीही मदत होऊ शकते.आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेता, पात्र व इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि खालील लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणी लिंक : https://forms.gle/LZhBzSmGGwuFbbMJ9 अधिक माहितीसाठी 02482-299033 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. हे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष सर्वेक्षण मोहिमेच आयोजन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

vishwatmaklokswamivarta

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

“स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”**जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta