vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षक मतदारसंघ मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज वाहतुकीत अंशतः बदल ; बियाणी चौक ते तपोवन गेट मार्ग बंद राहणार

शिक्षक मतदारसंघ मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज वाहतुकीत अंशतः बदल ; बियाणी चौक ते तपोवन गेट मार्ग बंद राहणार

 

अमरावती,दि. प्रतिनिधी:विधान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघ विभाग निवडणूक-२०२६ ची मतमोजणी मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मार्डी रोडवरील लोकशाही भवन येथे सुरू होत आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांची आणि शिक्षकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच बियाणी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावर फुटपाथचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत अंशतः बदल करण्यात आले आहेत.

   कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जारी केले आहेत.मतमोजणी प्रक्रीयेसाठी मोठ्या संख्येने येणार शासकीय व खाजगी नागरिक यांची व वाहनांची वर्दळ लक्षात घेता मतदान केंद्र परिसरात वाहतुक कोंडी, अपघात यासारखा प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. सर्व सामान्य नागरिकांचे जीवित रक्षण व कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरासमोरील मार्गावरील वाहतूक बंद करून इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे.

      प्रवेश बंदी मार्ग, बियाणी चौक ते तपोवन गेट दि. 27 ऑक्टोबर, 2026 सकाळी 6 वाजता ते मतमोजणी प्रक्रीया पू र्ण होईपर्यंत बंद राहील. मार्डी मार्गे तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांना अमरावती शहरात येण्याकरीता विद्यापीठ चौक ते रचना सृष्टी ते विक्रांत लॉन ते दंत महाविद्यालय ते वडाळी ओवरब्रिज चौक ते अंधविद्यालय ते चपराशीपूरा असा

पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.   बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील नागरीवस्ती चिलम छावणी, व्यंकय्यापूरा, जिजाऊ नगर, ओम कॉलनी येथील वाहन चालकांना मुख्य मार्गावर प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आह   यांना असणार सूट

   शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी, परिसरातील रहिवाशी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना आपले वाहने कार्यालय व निवासस्थानी जाण्या-येण्याकरिता आवश्यक वेळी बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करता येणार आहे.

    उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी, एचपी गॅस गोडाऊन, कोषागार कार्यालय, प्रबोधिनी कर्मचारी यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना आपले वाहने कार्यालय व निवासस्थानी जाण्याकरिता आवश्यक वेळी विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करता येणार आहे.

यांना लागू नसणार आदेश,    हे वाहतूक नियम रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीने महत्त्वाच्या व अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या आगमन निर्गमनाचे वेळी वाहतूक परिस्थितीनुसार सोडण्याचे चे अधिकार वाहतूक विभागात राहणार आहेत

      अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतुकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील असे या आदेशात सांगण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भुलेश्वर येथे गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर

मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार-गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर*धारणी पोलीस स्टेशनला भेट*अभ्यासिकेत पुस्तकांचे वाटप

नवी मुंबई महानगपालिकेची मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८७६ कोटींचा कर वसूल…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल