vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार – निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे 

दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार – निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे

 

    अमरावती, प्रतिनिधी:दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी आणि कर्जदारांची आर्थिक पिळवणूक करू नये, तसेच कर्जवसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती केल्यास संबंधित फायनान्स कंपनीवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिला आहे.

    महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून, यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि पीक उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मायक्रो फायनान्स संस्था आणि स्मॉल फायनान्स बँकांनी कर्जदारांकडून अवास्तव व्याज आकारू नये, तसेच वसुलीसाठी दबाव किंवा अनुचित पद्धतींचा अवलंब करू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

   या गंभीर विषयाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार,२ नोव्हेंबर २०२६ रोजी मायक्रो फायनान्स कंपन्या आणि स्मॉल फायनान्स बँकांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्जवसुलीच्या पद्धतींचा आढावा घेणे, अवास्तव व्याज आकारणी टाळणे आणि ग्रामीण कर्जदारांना दिलासा देणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

      दुष्काळाच्या काळात कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा अवास्तव व्याजामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास, त्यास सर्वस्वी संबंधित फायनान्स कंपनीला जबाबदार धरले जाईल आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व फायनान्स कंपन्यांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करून कर्जदारांवर कोणताही दबाव आणू नये, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनियुक्त शिक्षकांनी योगदान द्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना नियुक्ती आदेशांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण .

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यात प्रशासनाची तयारी सुरूमतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश;  निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta