vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम…

दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम…

राज्य प्रतिनिधी-दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर शासनाच्या २७ एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मोहीम राबवून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा जादा भाडेदर आकारण्यात येऊ नये. वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे विधीग्राह्य असल्याची खात्री करावी

प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५३३०२०९ यावर संबंधित तक्रार नोंदवावी. आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्रासह वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा rto.12-mh@gov.in या ईमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

#दिवाळीप्रवास #खासगीबस #जादा_भाडे #प्रवासीहित #परिवहनविभाग #आरटीओपुणे #प्रवासीसुरक्षा #पुणे #जिल्हामाहितीकार्यालयपुणे

संबंधित पोस्ट

सीवूड्स सेक्टर ४६-४८ मधील पोस्ट कार्यालयाची दयनीय अवस्था – सिडको व टपाल विभागाने लक्ष घालण्याची मागणी*

फुलंब्री येथे तालुकास्तरीय महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळा-संस्कारयुक्त शिक्षणातून सक्षम पिढी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत