vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औरंगाबादमध्ये सिडको परिसरात ब्रिटिशकालीन नाणी सापडल्याचीच चर्चा,औरंगाबादचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत…

औरंगाबादमध्ये सिडको परिसरात ब्रिटिशकालीन नाणी सापडल्याचीच चर्चा रंगली. औरंगाबादचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत…

 

औरंगाबादः प्रतिनिधी शहरातील सिडको परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठीच्या खोदकामात सव्वाशे वर्षांपूर्वीची नाणी आढळून आली आहेत. तब्बल दोन किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा  मुकूट व मुद्रा आहेत. औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाकडे  ही नाणी सुपूर्द केली आहेत.

सोन्याचा मुलामा दिलेली 1,850 नाणी

खोदकाम सुरु असताना एका कापडी पिशवीत ही नाणी सापडली. पिशवीत आणखी एका जीर्ण झालेल्या पिशवीत ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काहीही संपर्क झाला आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्यासाठी ज्वेलर्सना बोलावण्यात आले. तपासणीत नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतरही नाण्याचा रंग फिका पडत नसे.
ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट व मुद्रा आहेत. एकूण दोन किलो वजनाच्या या नाण्यांवर 1881 चा स्पष्ट उल्लेख आढळतो.

जेसीबीच्या कामात अचानक झाला खणखणाट

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीसला मिळालेले आहे. पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला. पाहणी केली असता एका गाठोड्यात नाणी सापडली. काही नाणी खड्ड्यातही आढळून आली. कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली

संबंधित पोस्ट

साताऱ्यातील  जावळी तालुक्यातील वाटंबे गावात करंजे गावात वृक्षारोपण, श्रमदान आदर्श निर्माण केला मंत्रालयातील 33 अधिकाऱ्यांनी

बुलढाणा येथील घटना,बालकामगाराचा,मृत्यूप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

मुंबईसह अनेक भागांत जोरदार मुसळधार पावसाचा इशारा

दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जालना लोकसभा मतदारसंघातील2061 मतदान केंद्रावर पथके रवाना

vishwatmaklokswamivarta

लोकसभेत सुरक्षाविषयी घडलेल्या घटनेची उच्चस्तरिय चौकशी- अध्यक्ष ओम बिर्ला…

vishwatmaklokswamivarta