vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औरंगाबादमध्ये सिडको परिसरात ब्रिटिशकालीन नाणी सापडल्याचीच चर्चा,औरंगाबादचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत…

औरंगाबादमध्ये सिडको परिसरात ब्रिटिशकालीन नाणी सापडल्याचीच चर्चा रंगली. औरंगाबादचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत…

 

औरंगाबादः प्रतिनिधी शहरातील सिडको परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठीच्या खोदकामात सव्वाशे वर्षांपूर्वीची नाणी आढळून आली आहेत. तब्बल दोन किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा  मुकूट व मुद्रा आहेत. औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाकडे  ही नाणी सुपूर्द केली आहेत.

सोन्याचा मुलामा दिलेली 1,850 नाणी

खोदकाम सुरु असताना एका कापडी पिशवीत ही नाणी सापडली. पिशवीत आणखी एका जीर्ण झालेल्या पिशवीत ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काहीही संपर्क झाला आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्यासाठी ज्वेलर्सना बोलावण्यात आले. तपासणीत नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतरही नाण्याचा रंग फिका पडत नसे.
ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट व मुद्रा आहेत. एकूण दोन किलो वजनाच्या या नाण्यांवर 1881 चा स्पष्ट उल्लेख आढळतो.

जेसीबीच्या कामात अचानक झाला खणखणाट

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीसला मिळालेले आहे. पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला. पाहणी केली असता एका गाठोड्यात नाणी सापडली. काही नाणी खड्ड्यातही आढळून आली. कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन,नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही…

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ; शिवसेनेची एकहाती सत्ता

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळ लालबागच्या राजा भाविकांच्या सेवेत; इथे पहा मंडपातून थेट प्रक्षेपण…

vishwatmaklokswamivarta

राज्यात २४ तास धोक्याचे जोरदार पावसाची शक्यता; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी..

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !आज३० नोव्हेंबर सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा*कार्यक्रमात प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सन्मान होणार*

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…