vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

महाराष्ट्रात ‘वादळ’ अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत; राऊतांचा भाजपला टोला..  

 महाराष्ट्रात ‘वादळ’ अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत; राऊतांचा भाजपला टोला..

 

मुंबई प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक वादळ निर्माण करणार, यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला. विरोधक साधी फुंकर मारतात पण त्यांना वादळ आल्यासारखं वाटतं. पण महाविकासआघाडीची १७० आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही. ठाकरे सरकारला साधा ओरखडाही उठणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील समस्यांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभागृहात आदळआपट करून प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही लोकशाही मानतो. लोकसभा आणि राज्यसभेत लोकशाही नसली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक परंपरा आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. आगामी काळात उद्धव ठाकरे आणखी सक्रिय होत महाराष्ट्रभर फिरतील, असेही त्यांनी म्हटले.

तसेच संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. चंद्रकांत पाटील अनेकदा म्हणतात की, अमुकतमुक व्यक्तीला काय किंमत आहे. पण माझा सवाल आहे की, चंद्रकांत पाटील यांना भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काय किंमत उरली आहे. मला चंद्रकांत पाटील यांची दया येते, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असेही राऊत यांनी म्हटले.

थोड्याचवेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. राज्यपाल कोश्यारी आज अभिभाषणात काय बोलणार, हेदेखील पाहावे लागेल. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर महाविकासआघाडी सरकारने भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखली होती.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

वचपा नंतर घेवू, काळजी करु नका”; हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंचा फोन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा…

vishwatmaklokswamivarta

दीपक केसरकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र केले आहे. ‘ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा थेट सवाल विचारतानाच ‘जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका’ असा इशाहाही आव्हाड यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  च्या आमदाराची भाजपाच्या   आमदाराला ‘ऑफर’…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अस्तित्व बोगस, त्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम नाही- संजय राऊत खासदार

vishwatmaklokswamivarta