vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  च्या आमदाराची भाजपाच्या   आमदाराला ‘ऑफर’…

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  च्या आमदाराची भाजपाच्या   आमदाराला ‘ऑफर’…

सातारा :प्रतिनिधी, जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाबाबत प्रचंड त्रुटी आहेत. मुळात साताऱ्याला टोल लागू नये, ही सर्वांची मागणी आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन झाल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  निश्चित सहभागी होईल. सर्व सातारकरांच्या एकजुटीचा जनरेटा निर्माण करणाऱ्या आंदोलनाची सध्या गरज आहे. यासाठी शिवेंद्रसिंहराजेंसह  कोणीही पुढाकार घ्यावा, आम्ही त्या आंदोलनात उतरण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, जिल्हा बँक राजकारणविरहित राहावी, यासाठी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणनीतीविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘जिल्हा बँक ही राजकारणविरहित असावी, या मानसिकतेतून बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या याद्यांचा कार्यक्रम सुरू असून, त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आहेत.’’ कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने तुमची अडचण होते का, या प्रश्नावर ते म्हणाले,‘‘ महाविकास आघाडीत सगळे एकत्र असल्याने थोडी अडचण होते. पण, सगळे सांभाळून घेऊन वाटचाल करत आहोत. सध्या माझ्याकडील जबाबदाऱ्यांचा व्याप वाढल्याने सगळीकडे थोडे थोडे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे कोरेगावकडे दुर्लक्ष होतेय असे नाही.’’

संबंधित पोस्ट

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची घेतली होती का? – नवाब मलिक*

32-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी 19उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 28 उमेदवारांचे 40 नामनिर्देशनपत्र

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातून गुजराती बाजुला केले तर…’; राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे संजय राऊत भडकले, CM शिंदे यांना थेट सवाल…

vishwatmaklokswamivarta

युवकांनो उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मोठी बातमी! शिवसेनेत अंतर्गत कलह, बैठकीत खासदारांनी वाचला तक्रारींचा पाढा…