vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई महानगरपालिकेत ब्रिटिश कालीन जुन्या पाण्याच्या वाहिन्यांचा भंगार  विक्रीचा  घोटाळा… चौकशी  करण्याची मागणी 

मुंबई महानगरपालिकेत ब्रिटिश कालीन जुन्या पाण्याच्या वाहिन्यांचा भंगार  विक्रीचा  घोटाळा… चौकशी  करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी  महापालिकेत रस्ते, भुखंड,औषध, उपकरणे खरेदीच्या घोटाळ्याचे आरोप होत होते. तर,आता भंगार घोटाळा झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

या घोटाळ्यामुळे पालिकेला कोट्यावधीचा फटका बसला आहे. महानगरपालिकेने 2700 मिमी व्यासाच्या ब्रिटीश कालीन जलवाहीन्या  भंगारात काढल्या आहेत.हे 10 हजार मेट्रीक टन वजनाचे पाईप विकून पालिकेला 32 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र,पालिका प्रशासनाने यासाठी निवीदा न मागवता परस्पर विक्री केली असून 32 रुपये किलोने विक्री झाली आहे. 2020 च्या दरानुसार ही विक्री करण्यात आली. सध्याचा भंगार दर 48 रुपये किलो आहे.तर दुसऱ्या खरेदी दाराने 37 रुपये दराने खरेदी करण्याची तयारी दाखवली होती.

बाजरभावानुसार पालिकेला 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.पालिकेनेने निवीदा काढून विक्री केली असती तरी उत्पनात वाढ झाली असती असा दावा भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी केला आहे.महापालिकेकडून केल्या जाणार्या खरेदीवर, तसेच प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते.पुर्वी बेस्ट उपक्रमातील भंगार विक्रीवरही आरोप झाले आहेत.मात्र,पहिल्यांदाच पालिकेच्या भंगार विक्रीवर आरोप झाला आहे.या पिरस्तावाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित मंजूरी दिली आहे. पालिकेकडे 45 भंगार खरेदी दारांची नोंदणी आहे.त्यांच्याकडून अंदाजपत्र मागवले असते तरी उत्पन्नात वाढ झाली असती असा दावा केला जात आहे. मात्र,ठराविक खरेदीदाराला हा माल विकल्या बद्दल आक्षेप घेण्यास सुरवात झाली आहे.-चौकशीची व्हायला हवी अशा प्रकारे निवीदा न काढता विक्री का झाली हा प्रश्न आहे.हा निर्णय कोणी घेतला याबाबतही चौकशी झाली पाहिजे असेही मिश्रा यांनी नमुद केले.तसेच यापुर्वीच्या भंगार खरेदीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही पत्र देण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जागतिक वन्यजीव दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील मुसळधारेने १७ धरणे तुडूंब भरून वाहू लागले.

vishwatmaklokswamivarta

राज्यात महिला सन्मान योजना’ आजपासून लागू, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत..

इलेक्ट्रिकल,ओला इ स्कूटर चे तुफान बुकिंग, जगात बनविला रेकॉर्ड.

vishwatmaklokswamivarta

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल..  

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

vishwatmaklokswamivarta