vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

मुंबई प्रतिनिधी –

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला  सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणूक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्षे झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा, असे संकेत दिले. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी ऑगस्टमध्ये होऊन निकाल यावा, हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. शिंदे गटाच्याच्या वतीने म्हणणं होतं की, हे दोन वर्ष झोपा काढत होते, त्यांनी काहीच केलं नाही. सुप्रीम कोर्ट म्हणालं, तरी जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावा लागेल कधी ना कधी. ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात देऊ आणि अशी तारीख देऊन ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल. आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर युक्तिवाद होतील त्याच्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल, अशी शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवादद्वारे जनतेच्या समस्या घेतल्या जाणून नियमाकुल प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ-आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही-राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta