
*गुंगीकारक व अवैध असलेली औषधे जप्त करून डोंगरी पोलीस ठाणेची बेधडक कारवाई…
*मुंबई:* *डोंगरी पोलीस ठाणेचे दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक बायसठाकूर* यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने डोंगरी मोबाईल 02 वाहनावरील अंमलदार पोलीस *हवालदार पवार व पो.ना.म्हात्रे* हे पोलीस ठाणे हद्दीत उमरखाडी परिसरात गस्त करत असताना त्यांना MH- 01-CJ- 2256 ही टॅक्सी संशयितरित्या आढळून आली असल्याने पोलिस हवालदार पवार यांनी सदर टॅक्सी चालकाकडे चोकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सदर टॅक्सी डोंगरी पोलीस ठाणेस आणण्यात आली.
सदर टॅक्सीतील मालाचा दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता,सदर टॅक्सीत *PHENSIREST Cough syrup,100ml, Contain Codeine Phosphate च्या प्रत्येकी 144 बॉटल्स असलेले 22 बॉक्स असे एकूण 3168 बॉटल्स आढळून आल्याने जप्त* कऱण्यात आले असून सदरबाबत *पो. ह. पवार* यांनी फिर्याद दिल्याने वि. स्था. गुरक 22 /2022 कलम 8(c),22(c),29NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून चालक नामे *मोहम्मद बशीत फारुख अन्सारी, वय -35 वर्षे व त्याचा साथीदार नामे अजीम मोहम्मद खान, वय -36* वर्षे या दोघांना अटक करण्यात आली. *एकूण रक्कम रु.3,42,144/-(1 बॉटल प्रत्येकी 108 रुपये )*
*सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबाना शेख तसेच दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक बायसठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी तसेच पोलिस उपनिरीक्षक आरडक व पोलीस उपनिरीक्षक येडगे यांच्या मदतीने करण्यात आली आहे.*
सदर प्रकरणाबाबत डोंगरी पोलीस ठाणेतील पोलीस कसोशीने तपास करत आहेत.
माहितीस्तव सादर,
*(शबाना शेख )*
*वरिष्ठ पोलीस निरीक्षक,*
*डोंगरी पोलीस ठाणे,*
*मुंबई…*



