
आरसीबी-चेन्नई मॅचदरम्यान मुलीने गुद्यावर बसून प्रियकराला केलं प्रपोज, फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल…
IPL 2022, CSK vs RCB: पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स संघात जोरदार सामना सुरु असताना मॅचदरम्यान प्रेक्षक स्टँडमधील एका मुलीने आरसीबीची जर्सी घातलेल्या तिच्या प्रियकराला प्रपोज केले. दोघांनी एकमेकांना मिठी मारण्यापूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या बोटात अंगठी घातली. चेन्नई सुपर किंग्स धावांचा पाठलाग करताना कॅमेऱ्यांनी एक सुंदर क्षण टिपला.
IPL 2022, CSK vs RCB: पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supers Kings) संघात जोरदार सामना सुरु असताना मॅचदरम्यान एका मुलीने स्टेडियममध्ये चक्क गुडघ्यावर बसून आपल्या प्रियकरायला प्रपोज करत आश्चर्याचा धक्का दिला. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
पाश्चिमात्य देशांमधील हा एक ट्रेंड आहे ज्यामध्ये जोडपे एकमेकांना प्रपोज करताना दिसता. पण आता क्रिकेट सामन्यांमध्येही हे वारंवार घडताना पहिले गेले आहे. या जोडप्यासाठी स्टॅन्डमध्ये उपस्थित इतर चाहत्यांनी जल्लोष केला



