vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजप नेते ताजमहलाच्या खाली पंतप्रधान मोदींची पदवी शोधत आहेत; Taj Mahal उत्खननाच्या मागणीवर संतापले असदुद्दीन ओवेसी

भाजप नेते ताजमहलाच्या खाली पंतप्रधान मोदींची पदवी शोधत आहेत; Taj Mahal उत्खननाच्या मागणीवर संतापले असदुद्दीन ओवेसी…

मुंबई प्रतिनिधी

ओवेसी यांनी शिवसेनेच्या युतीत सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विधानसभा निवडणुकीत ओवेसींना मतदान करण्यास सांगत होते. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेशी लग्न केले. तीन पक्षांपैकी कोणती वधू आहे हे मला माहीत नाही.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी महाराष्ट्रातील भिवंडीत एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी ओवेसी म्हणाले, “भाजप नेते ताजमहलच्या खाली पंतप्रधानांची पदवी शोधत आहेत.”

काही आठवड्यांपूर्वी उफाळलेल्या ताजमहल वादाच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. आग्रा येथील ताजमहालमधील 22 बंद खोल्यांमागील सत्य शोधण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने याचिका दाखल केली होती. प्रत्यक्षात येथे जुने शिवमंदिर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 12 मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि सांगितले की, अशा गोष्टी इतिहासकारांवर सोडल्या पाहिजेत.

त्याच भाषणात ओवेसी म्हणाले की, ‘मुघल भारताबाहेरून कसे आले याबद्दल भाजप बोलत असते. परंतु, जगाच्या विविध भागांतून इतर अनेक समुदायांचे लोकही भारतातून आले. फक्त द्रविड आणि आदिवासी भारतातील आहेत. भारत ना माझा आहे, ना ठाकरे, ना मोदी-शाहांचा. भारत कोणाचा असेल तर तो द्रविड आणि आदिवासींचा आहे. भाजप-आरएसएस मुघलांच्या नंतर आहे.’

ओवेसी यांनी शिवसेनेच्या युतीत सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विधानसभा निवडणुकीत ओवेसींना मतदान करण्यास सांगत होते. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेशी लग्न केले. तीन पक्षांपैकी कोणती वधू आहे हे मला माहीत नाही, अशी खोचक टीकाही ओवेसी यांनी यावेळी केली.

संबंधित पोस्ट

एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायलयाचे राज्य सरकारला हे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

दत्तजयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मुंबई आणि पालघर जिल्ह्यात -एकूण ३८ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन !

vishwatmaklokswamivarta

मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी महानगरपालिकेची विशेष तयारी..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा,वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल- कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta