vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय; गुणांकनाच्या कोणत्याही अटीशिवाय नक्षलवादी युवक-युवतींना ‘आयटीआय’ला प्रवेश

राज्य सरकारचा मोठा निर्णय; गुणांकनाच्या कोणत्याही अटीशिवाय नक्षलवादी युवक-युवतींना ‘आयटीआय’ला प्रवेश…

महाराष्ट्र प्रतिनिधी

नक्षली चळवळीतून शरण आलेल्या युवक-युवतींना कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. यानक्षलग्रस्त (Naxalite) जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात 2 नवीन आयटीआय (ITI) सुरु करण्यात येत असून यामध्ये नक्षलग्रस्त शरणार्थी किंवा त्यांच्या पाल्यांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलवादातून शरण आलेल्या व आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींसाठी या आयटीआयमध्ये प्रवेशाकरिता गुणांकनाची कोणतीही अट असणार नाही, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली दृष्टीने विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोपे म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात पालांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या दोन नवीन आयटीआय यासाठी सुरु करण्यात येत आहेत. प्रवेश सत्र 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सूट देण्यात आली असून त्यांना संस्थास्तरावर प्रवेशाची संधी मिळणार आहे.

नक्षली चळवळीतून शरण आलेल्या युवक-युवतींना कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. टोपे म्हणाले, या दोन्ही आयटीआयमध्ये मिळून एकूण 360 विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. दोन्ही आयटीआयमध्ये जोडारी, विजतंत्री (इलेक्ट्रिशीयन), तारतंत्री (वायरमन), यांत्रिक मोटारगाडी आणि सुइंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल

संबंधित पोस्ट

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना-जिल्ह्यात”मॉडेल सोलर व्हिलेज” ची निवड होणारजिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील..> १ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

संतसाहित्य हाच जीवनाचा आधार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-मतदान केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta