vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-मतदान केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-मतदान केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

 

राज्य प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

आदेशात म्हटले आहे, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करण्यास मनाई केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई केली आहे.

हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना लागू असणार नाही. हा आदेश 20 नोव्हेंबर 2024 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील.

00000

संबंधित पोस्ट

शेतकरी उत्पादक संस्था स्थापण्यास व समूह संकलन केंद्र उभारणीस मान्यता डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्हाधिकार्‍यांकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

राज्यात धो-धो पावसामुळे चाळीसगाव सह  नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा  गिरणा नदीला पूरची शक्यता. 

vishwatmaklokswamivarta

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta