vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात धो-धो पावसामुळे चाळीसगाव सह  नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा  गिरणा नदीला पूरची शक्यता. 

राज्यात धो-धो पावसामुळे चाळीसगाव सह  नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा  गिरणा नदीला पूरची शक्यता

नाशिक प्रतिनिधी :संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे किती बदलत आहे आता आहे जळगावचा : मन्याड धरण परिसरात ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे गावाला पुराचा वेढा पडला आहे. दुसरीकडे जामदा बंधारा ओसांडून वाहत आहे. मन्याड नदी पुढे गिरणा नदीला येऊन मिळत असल्याने गिरणा नदीला मोठा पुर येण्याची स्थिती दिसून येत आहे. काठावरील नागरिकांना सावधानतेचा गिरणा पाटबंधारे विभागाने दिला आहे. घोडेगाव, करजगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाला. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी रात्र जागून काढली. खानदेशातील लोकशाहीर व नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी शाहीर शिवाजीराव पाटील यांचे घर पावसामुळे कोसळले आहे.

पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने नांद्रे ता. चाळीसगाव येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारची रात्र वैऱ्याची ठरली. संपूर्ण गावांला पुराने वेढा दिल्याने अनेकांची गुरे, पत्र्याचे शेड, इलेक्ट्रिक पोल, ट्रान्सफॉर्मरसह विज तारा वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, मका, पपई पिक वाहुन गेले. ५० वर्षात असा पूर पाहिला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय गणेशपूर व पिंप्री परिसरात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. ओढरे, चितेगाव, उंबरहोळ येथील लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत डोंगरी व तितूर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर दुसरीकडे काही गावांमध्ये पाणी घुसल्यामूळे संपर्क तुटला होता.

संबंधित पोस्ट

दैनिक भास्कर, नागपूरचा २२ वा वर्धापन दिन-पत्रकारितेच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाला आज मिळणार पाच नवीन न्यायाधीश; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड देणार शपथ

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024/ 24-कल्याण लोकसभा मतदारसंघात चौथ्या दिवशी 9 नामनिर्देशनपत्र दाखल

अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं.  यात्रेच्या पहिल्या सहा दिवसांत ९३ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं आहे.

vishwatmaklokswamivarta