
राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले; काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन, प्रियंका गांधी यांचीही उपस्थिती…
मी दिसली प्रतिनिधी
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) प्रकरणात काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडी कार्यालयात आज चौकशी होणार आहे. या चौकशीला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी दिल्ली येथील अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात दाखल झाले आहेत.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) प्रकरणात काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडी कार्यालयात आज चौकशी होणार आहे. या चौकशीला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी दिल्ली येथील अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात दाखल झाले आहेत. या वेळी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिपदर्शन केले आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यादेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखलही झाले आहेत. त्यांची किती काळ चौकशी होते याबाबत उत्सुकता आहे.
राहुल गांधी हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यादेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे एकाच गाडीतून इडी कार्यालय आवारात दाखल झाले. राहुल गांधी इडी कार्यालयात गेले. प्रियंका गांधी बाहेर थांबल्या. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्तेही ईडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. त्यांना ईडी कार्यालयापासून साधारण एक किलोमीटर दूर अंतरावर बॅरिकेट्स लावून पोलिसांनी अडवले आहे. राहुल गांधी हे पायीचईडी कार्यालयात दाखल झाले
काग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, आम्ही अत्यंत शाततापूर्ण मार्गाने इडी कार्यालयात दाखल होऊ. आम्हाला अडविण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही अटक करुन घेऊ.



