vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

 विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

विदेश प्रतिनिधी-तियानजिन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता शांघाय शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित   म्हणाले की ,विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे ते म्हणाले

भारताने SCO चा सदस्य म्हणून सकारात्मक भूमिका बजावली आहे. SCO संदर्भातील भारताचे दृष्टीकोन आणि धोरण तीन महत्वाच्या आधारस्तंभांवर आधारित: S -Security (सुरक्षा), C-Connectivity (कनेक्टिव्हिटी), O – opportunity(संधी) : याबाबत बोलताना म्हणाले की

कोणत्याही राष्ट्राची प्रगती आणि विकासाचा पाया सुरक्षा, शांतता आणि स्थिरता यांवर अवलंबून असते. मात्र, ही उद्दिष्टे साध्य करण्यात दहशतवाद आणि फुटीरतावाद यासारख्या महत्त्वाच्या आव्हान अनेकदा अडथळा आणतात,विशेषतः दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान आहे: प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले दरम्यान

गेल्या चार दशकांपासून, भारताने दहशतवादाचा त्रास सहन केला . असंख्य मुले गमावली आणि अनेक मुलं अनाथ झाली. अलिकडेच, पहलगाममध्ये, आपण दहशतवादाचा अतिशय भयानक चेहरा पाहिला. या दुःखाच्या वेळी, आपल्या पाठीशी उभे राहिलेल्या मित्र राष्ट्रांचे मी मनापासून आभार मानतो: असे ते म्हणाले

या वर्षी, भारताने संयुक्त माहिती ऑपरेशन्समध्ये आघाडी घेतली आहे, दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याविरुद्ध आवाज उठवला. या संदर्भात दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो : असल्याचे यावेळी ते म्हणाले

♦️ तियानजिन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता शांघाय शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले यावेळी

पंतप्रधान  नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर जागतिक नेते तियानजिन, चीनमध्ये एससीओ (SCO) शिखर परिषदेत उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओ (SCO) शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला.तियानजिनमध्ये सुरु असलेल्या एससीओ शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करताना दिसून आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह फोटो शेअर केला आहे ते ट्विट मध्ये म्हणाले, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेताना नेहमीच आनंद होतो..

 

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

जनकल्याण यात्रा पोहोचली बुलढाण्यात-* विशेष सहाय्य योजनांची जनजागृती* जिल्हाधिकारी कार्यालयातून शुभांरभ; योजनांचा जागर होणार

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक