
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणूकीत त्यांचं मत अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात मागितली दाद; 15 जूनला सुनावणी…
मुंबई प्रतिनिधी आमदार सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर या तिघांच्या मतांवर भाजपाने आक्षेप नोंदवला होता त्यापैकी सुहास कांदेचं मात अवैध ठरवून तब्बल 7 तासांनी मतमोजणी सुरू करण्यात आली होती.
10 जूनला पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीदरम्यान शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं मत निवडणूक आयोगाने अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणावर 15 जूनला सुनावणी होणार आहे.



