vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडे ही मागणी…. विश्व वारकरी सेना

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडे ही मागणी…. विश्व वारकरी सेना

 

राजकीय प्रतिनिधी

 

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. मराठा युवा सेनेनंतर आता विश्व वारकरी सेनेने ही मागणी केली आहे.

 

सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ विश्व वारकीर सेनेने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे  यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे  ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे. आगामी काळात राज्यातील वारकरी देखील अशी शपथ घेतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी याआधी मराठा युवा सेनेने  देखील केली आहे. अंधारे यांचं हिंदुत्त खोटं आहे. त्यांची हक्कालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारा मराठा युवा सेनेने दिला आहे

हिंदू धर्मातील देवतांना थोतांड म्हणणाऱ्या या सुषमा अंधारे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ताबडतोब पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे अन्यथा हिंदू मताचे विभाजन होत राहणार असे चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे

संबंधित पोस्ट

विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदममाझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा

vishwatmaklokswamivarta

गर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

आगामी जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस कोणतीही वैचारिक तडजोड न करता, समविचारी पक्षांना शक्य तिथे सोबत घेवून लढवणार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ.

vishwatmaklokswamivarta

विनयभंगाच्या गुन्ह्यावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोमय्यांवर तोफ डागली

महाराष्ट्रात अल्टीमेटम, हुकुमशाही चालणार नाही; अजीत पवार यांचा स्पष्ट इशारा..

vishwatmaklokswamivarta