vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात 4 ते 7 जुलैपर्यंत पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…

महाराष्ट्रात 4 ते 7 जुलैपर्यंत पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…

 

मुंबई

खास प्रतिनिधी

हवामान खात्याने (IMD) गुजरात, ओडिशा आणि झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

 

मान्सूनने (Rain) देशात दस्तक दिली असून नैऋत्य मान्सून पसरला आहे. या कारणास्तव, बहुतांश भागात पावसाचे वृत्त आहे. हवामान खात्याने (IMD) गुजरात, ओडिशा आणि झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) चेन्नई आणि उपनगरात पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

शनिवारी हवामान खात्याने सांगितले की, दिल्लीत पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत रविवारी दिवसाची सुरुवात प्रसन्न सकाळने झाली आणि किमान तापमान 26.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंश सेल्सिअसने कमी आहे. हवामान खात्याने याआधीच दिवस मुख्यतः ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता वर्तवली होती.

 

दुसरीकडे, अनेक राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडणार असल्याने हवामानात बदल होऊन नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढील पाच दिवस गुजरात, कोकण, गोवा, किनारपट्टी कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, कराईकल आणि माहे येथे मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 

 

त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 4 ते 7 जुलैपर्यंत पाऊस पडेल. हवामान खात्यानुसार, कर्नाटकच्या अंतर्गत भागात 5 ते 7 जुलै दरम्यान पाऊस पडेल. कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य भारताच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे.

 

संबंधित पोस्ट

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार

इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपीत केला पृथ्वी निरीक्षण उपग्रह…

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…

हैदराबादमधील कस्तुरबा कॉलेजच्या प्रयोगशाळेत रासायनिक वायू गळती; 25 विद्यार्थी बेशुद्ध

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली  

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…