vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्लीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग, शिंदे-फडणवीस यांची अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट

दिल्लीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग, शिंदे-फडणवीस यांची अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट

नवी दिल्ली प्रतिनिधी: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्याआधी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. शिंदे-फडणवीस आज पंतप्रधान मोदी यांनी भेट घेणार आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अमित शहा यांच्यासोबत साडे चार तास बैठक झाली. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तब्बल साडेचार तास त्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा झाली.

 

आज फडणवीस आणि शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात नव्या आणि तरूण चेह-यांना संधी देण्याबाबत शाह यांच्याशी चर्चा झाली. शिंदे आणि फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या याचिकेबाबत विधिज्ञांसोबतही चर्चा केली. तर शिवसेनेचे निवडणूक चिन्हं तसेच विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांवर घेतलेल्या आक्षेपांबाबत चर्चा झाली. www.sochindia.asia

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिके चे आवाहन- पाइपलाइन कामासाठी- 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता शटडाउन सुरू होईल आणि गुरुवार, 6 फेब्रुवारी, 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी मोठी, शहरातील 20 हजारांवर गेलेली कोरोना दैनंदिन रुग्णसंख्या ही आता नियंत्रणात, सातत्याने रुग्णसंख्येत घट होत आहे

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध , रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  बारसूत जाणार..

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि