vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

महाराष्ट्र प्रतिनिधी

चंद्रकांत दादा म्हणाले त्याचा चूकीचा अर्थ काढला जात आहे. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील निवडणुकीत आम्ही चांगले जिंकुन येवू असे फडणवीस म्हणाले.’

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदामुळे भाजपमध्ये (BJP) एक मोठा गट नाराज असल्याचे पुढे आले आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या भाषणातील वक्तव्यामुळे या नाराजीची अधिक चर्चा उघडपणे सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केल्याची भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पनवेल येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केलेल्या भाषणात पाटील यांनी यांनी हे व्यक्तव्य केले. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. समारोपाच्या वेळी त्यांनी म्हटलं की, ‘एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले त्याचा चूकीचा अर्थ काढला जात आहे. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील निवडणुकीत आम्ही चांगले जिंकुन येवू असे फडणवीस म्हणाले

दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाल्याने हे भाषण आता सोशल मीडियावरुन हटवल्याचे समजते. पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले होते. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी पूर्ण प्रकरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी माविआवर निशाना साधला, ते म्हणाले, गेली अडीच वर्ष संघर्षात गेली. राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. गेले अडीज वर्ष राज्यात विकास थांबला होता. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. हे पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? पण राज्यात सत्तांतर झाल आणि आपल सरकार आलं. हे सरकार यावं, ही तर श्रींची इच्छा होती. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही तर राज्यातील जनतेच्या सुटकेसाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी हे परिवर्तन आहे. असे फडणवीस म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

दैनिक भास्कर, नागपूरचा २२ वा वर्धापन दिन-पत्रकारितेच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिरात मध्ये घटस्थापनेची विधी झाल्यावर देण्यात आली तोफेची सलामी

vishwatmaklokswamivarta

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी**श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच !* – श्री. सुनील घनवट, मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-विधानसभा मतदार संघासाठी 2 उमेदवारांचे 3 अर्ज दाखल आजपर्यंत 158 उमेदवारांना 403 नामनिर्देशन अर्जाचे वितरण

vishwatmaklokswamivarta

भाजपला रोखण्याच्या नादात काँग्रेसने स्वता:ला बर्बाद करु नये, राज्यातून सोनिया गांधींना आणखी एक पत्र….

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !