vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरे रोड 24 तासांसाठी बंद, मेट्रो कारशेडसाठी झाडं कापायला सुरुवात?

आरे रोड 24 तासांसाठी बंद, मेट्रो कारशेडसाठी झाडं कापायला सुरुवात?

 

आरे रोड 24 तासांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. MMRC आणि MCGM द्वारे सुरू असलेल्या विविध कामांसाठी हा रस्ता तात्पुरता बंद केला आहे, अशी माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे.

आरे रोड आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 म्हणजे 24 तासांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. MMRC आणि MCGM द्वारे सुरू असलेल्या विविध कामांसाठी हा रस्ता तात्पुरता बंद केला आहे. तरी या मार्गावरील पवई आणि मरोळला जाणारी वाहनं JVLR रस्त्याने वळवल्याची माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून  देण्यात आली आहे.

या दरम्यान मेट्रो कारशेडसाठी झाडं कापयला सुरुवात केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आरेतील मेट्रो प्रकल्पासाठी नव्याने झाडे कापावी लागणार नाहीत, असे म्हटले होते. पण 24 तास आरे रोड  बंद म्हणजे आता परिसरात झाडे कापण्यासाठी रोड बंद केला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

 

आरे वाचवाच्या एल्गारात आता आम आदमी पक्षही उडी घेतली आहे. तर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. ‘आरे’ कारशेडबाबत ‘नव्या उपमुख्यमंत्र्यांनी (पुनर्विचार करावा’, अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती. म्हणजेच राजकीय मतभेद असले तरी आरे वाचवण्यासाठी ठाकरे पुत्र पुढे आले आहेत. देशभरात आरे वाचवा चा एल्गार बघता आरे संरक्षणाचा हा वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही

 

संबंधित पोस्ट

650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना;आधार प्रमाणिकरणासाठी दि.३० पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

पोलिस मुख्यालयात वाहतूक विभाग वरळी सल्लागार समितीचा संवाद मेळावा यशस्वी पार पडला**

vishwatmaklokswamivarta

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी.

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता मनापासून सागर किनार्यापर्यंत*कोस्टल डे निमित्त संपूर्ण मुंबई शहराचे किनारे स्वच्छतेसाठी मबैतील युवापिढी सज्ज असतानाच जी.उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सकापाले यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन श्री. कयूम काझी यांनी आपल्या टीम सहित दादर माहीम बीचवर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उहापोह करण्याचा अनोखा प्रयोग केला

vishwatmaklokswamivarta