vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महागाईविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांचा कडक बंदोबस्त….

 महागाईविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांचा कडक बंदोबस्त….

पुणे प्रतिनिधी : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर प्रत्येक गाडीचं चेकिंग करण्यात येत आहे. बेस्टच्या बससेवरही करडी नजर आहे. तर राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदींसह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी या नेत्यांना विधानभवनातच अडवले. काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ सुरु झाला. मात्र, पोलिसांनी सगळ्यांचीच धरपकड केली. महागाईविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन सुरु आहे.

 

 

मुंबईत हँगिंग गार्डन ते राजभवन असा काँग्रेसचा मोर्चा होता. गिरगाव चौपाटी येथे मोर्चा रोखत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत होता. काँग्रेस मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

महागाईविरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. महागाईविरोधात काँग्रेसने देशभरात एल्गार पुकारला असून, राहुल गांधींच्या नेतृत्वात देशभरात आंदोलन सुरु आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर महागाईवरून हल्लाबोल केला. देशात लोकशाही उरलेली नाहीये, काँग्रेसनं 75 वर्षांत कमावलं, ते भाजपने 8 वर्षात गमावल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. सरकारविरोधात आवाज उठवल्यावर अटक होते, देशात ईडीची दहशत दाखवली जात असून, हुकूमशाही सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले. देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून, महागाईवर अर्थमंत्री का बोलत नाहीत?, असाही सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा…

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन- पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू

कृपया प्रसिद्धीसाठी !सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !

vishwatmaklokswamivarta

आज सकाळी मुंबईत धुक्याचा थर ,हवेची गुणवत्ता ढासळल्याने

vishwatmaklokswamivarta

आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

vishwatmaklokswamivarta