vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील 25 वर्षीय अभिनेत्रीचा विनंभंग, स्टॉक ब्रोकरला अटक

मुंबईतील 25 वर्षीय अभिनेत्रीचा विनंभंग, स्टॉक ब्रोकरला अटक…

मुंबई प्रतिनिधीचित्रपटात भूमिकेसाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक वाढवली आणि तिचा विनयभंग (Molestation) करत लैंगिक शोषण केले असा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली.

अभिनेत्रीचे लैंगिक शोषण आणि विनयभंग केलेप्रकरणी एका स्टॉक ब्रोकरला (Stock Broker) मुंबई पोलिसांनी अंधेरी (Andheri) येथून अटक केली आहे. चित्रपटात भूमिकेसाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक वाढवली आणि तिचा विनयभंग (Molestation) करत लैंगिक शोषण केले असा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली. जिग्नेश मेहता (48) असे या ब्रोकरचे नाव आहे. त्याने एका 25 वर्षीय महिलेला अंधीर पूर्व येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी बोलावले होते. त्याने दावा केला होता की एका चित्रपट निर्मात्याशी तिची भेट घालून द्यायची आहे, असे एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देऊन सांगितले.

 

दरम्यान, हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मेहता याने हॉटेलच्या खोलीत तिला (अभिनेत्रीला) अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली.तिथे तिसरा कोणीही उपस्थित नव्हता. पण मिळाल्याले संधीचा फायदा घेऊन खोलीबाहेर पळून जाण्यात तक्रारदार यशस्वी झाला. त्याने हॉटेलच्या रिसेप्शनवरून पोलिसांना बोलावले. पोलिस येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी मेहता यांना तिथेच थांबवले, असेही पोलिसांनी सांगितले.

महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि इतर गुन्ह्याखाली मेहता याला अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेने पोलिसांना सांगितले आहे की तिची मेहता यांच्याशी ओळख चेंबूर येथे एका पार्टीत झाली जिथे दोघांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली.

संबंधित पोस्ट

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

संकुलावर आंतरराष्‍़ट्रीय योग दिन उत्साहात साजर निरोगी शरीर व मनासाठी सर्वांनी नियमित योगा करावा- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित योग शिबीरास जालनेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

vishwatmaklokswamivarta

14 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत**भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण*

आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना #श्रद्धांजली अर्पण केली

vishwatmaklokswamivarta