
माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
मुंबई प्रतिनिधी
माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेक यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्यावर नांदेड एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले.
माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भोकरदनमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. उमरी तालुक्यातील गोरठा या मूळ गावी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज (25 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील एक प्रमुख नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. विविध पदे भूषवूनही संयमी राहिलेला नेता अशी त्यांची तालुका आणि जिल्ह्यात ख्याती होती. शब्द पाळणारा निष्कलंक, निस्वार्थी, धाडसी व्यक्तिमत्व, एक संघर्षयोद्धा, चारित्र्यवान नेता अशी त्यांची ओळख होती. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. राष्ट्रवादीचा झेंडा सोडून त्यांनी मधल्या काळात भाजपची पताकाही हाती घेतली होती. मात्र, ते तिकडे फारसे रमले नाही. त्यांनी पुन्हा घरवापसी केली
बापूसाहेब गोरठेकर यांना राजकीय वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिले. वडीलांप्रमाणेच बापूसाहेब गोरठेकर हे सुद्धा आमदार झाले. ते नेहमी भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असत. मात्र, त्यांनी नायगाव येथून अपक्ष निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र, पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले.



