
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे
मुंबई प्रतिनिधी
आनंद दिघेंच्या स्मृतिदिनानिमित्त CM शिंदेंनी पोस्ट केलेली चारोळी चर्चेत आपल्या प्रत्येक भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतच आनंद दिघेंचा आवर्जून उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची पोस्ट चर्चेत
राज्यामध्ये सत्तापालट घडवणारे शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन. याचनिमित्त शिंदे यांनी सोशल मीडियावरुन दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कवितांच्या माध्यमातून विरोधकांना चिमटे काढणाऱ्या शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरुला आंदरांजली वाहण्यासाठीही चारोळ्यांचा आधार घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिघे यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट केली आहे. “वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या प्रत्येक भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आनंद दिघेंचा आवर्जून उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी असल्याचं दिसत आहे.



