vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*

*विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*

 

  मुंबई, प्रतिनिधी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो. मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात. शासकीय वसतीगृह इमारतींची जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी.वसतीगृहातील

विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी. तसेच वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी.जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक एस.ओ.पी तयार करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

   या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.*****

संबंधित पोस्ट

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta

कोयना धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – मंत्री मकरंद जाधव – पाटील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती; मंत्रालयात आढावा बैठक

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

आ.सुधीर मुनगंटीवार यांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला !शेगाव, आळंदीप्रमाणे होणार विकास ; २७ जानेवारीला निवेदन, २९ जानेवारी विषय मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिले कार्यवाहीचे आदेश

vishwatmaklokswamivarta