महाकुंभमेळा प्रयागराज येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले
महाकुंभमेळा प्रयागराज येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले…
राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान केले.
यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे या महाकार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन ज्या ‘पद्धतशीर पद्धतीने’ केले आहे त्याचे मुंडे यांनी कौतुक केले. 2027 मध्ये होणाऱ्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी या अनुभवांचा वापर करता यावा म्हणून आपण येथे अभ्यास करण्यासाठी आले असल्याचे त्या म्हणाल्या.
याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, ‘हिंदू धर्माचे प्रतीक असलेला महाकुंभपर्वाचा योग हा 144 वर्षांनी जुळून आला असून यानिमित्ताने हिंदू चेतनेचा हा विशाल जनसागर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला मिळाली. या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आतापर्यंत 60 कोटी नागरिक येऊन गेले असून हा एक विक्रम आहे. या कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले त्या ते देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री.योगी आदित्यनाथ यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा महाकुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जे नियोजन केले आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
दरम्यान यांनी ट्विटरवर याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ की
यह अभिनंदन हे आस्था का,
वंदन है विश्वास का,
जयघोष है सनातन का,
उद्घोष है महाकुंभ का,
हर-हर गंगे…!
#उत्तर_प्रदेश राज्यातील #प्रयागराज येथील गंगा-जमुना-सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर आयोजित महाकुंभमेळ्याला उपस्थित राहून त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचा अलौकिक आनंद घेतला.
यावेळी माझी पत्नी सौ.लता शिंदे. मंत्रिमंडळातील माझे सदस्य दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, संजय राठोड, मीरा भाईंदरचे विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह उपस्थित होते.