
“
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या ‘भूमिपुत्र’ या स्मृतीग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात त्यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला…
अकोला प्रतिनिधी
अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला आणि…”, फडणवीसांनी सांगितला फुंडकरांचा ‘तो’ किस्सा
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या ‘भूमिपुत्र’ या स्मृतीग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात त्यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला. “एका लोकसभेत अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून शिवसेनेला गेला आणि दोन्हीही पक्षांना निवडून येण्याची आशा नव्हती. मात्र भाऊसाहेब फुंडकरांनी बाळासाहेब ठाकरेंशी बोलून तो मतदारसंघ घेतला आणि निवडून आले,” अशी आठवण फडणवीसांनी सांगितली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकसभेची निवडणूक होती तेव्हा अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला होता. दोन्हीही पक्षांना फार आशा नव्हती. मात्र, भाऊसाहेब फुंडकर यांनी स्वतः निर्णय घेतला की नाही, आम्ही हा मतदारसंघ जिंकू शकतो. ते प्रमोद महाजन यांच्याशी बोलले. ते म्हणाले आपण अकोला मतदारसंघ शिवसेनेला दिलाय, पण मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो.”
“या व्यक्तीत ‘स्पार्क’ हे बाळासाहेब ठाकरेंच्याही लक्षात आलं”
“भाऊसाहेब फुंडकर बाळासाहेब ठाकरेंना जाऊन भेटले. या व्यक्तीत ‘स्पार्क’ आहे आणि ते जे सांगत आहे त्यात तथ्य आहे हे बाळासाहेब ठाकरेंच्याही लक्षात आलं. हा मतदारसंघ निवडून येऊ शकतो. यानंतर भाऊसाहेबांनी या मतदारसंघाची नव्याने मांडणी केली. तिथले राजकीय गणितं बसवले आणि ते निवडून आले. त्यांनी लोकसभेत नवी सुरुवात केली,” असं फडणवीसांनी सांगितलं.



