vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पौष्टिक तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी*

*पौष्टिक तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी*

सातारा प्रतिनिधी: जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा कार्यालयामार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सावाचे अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सव कालावधीत शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची सुमारे 22 लाख रुपयांची ग्राहकांनी खेरदी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

 शेतक-यांनी शेतीमाल पिकवण्याबरोबर विक्री कौशल्य विकसीत करून थेट माल विक्रीद्वारे जास्तीत जास्त नफा मिळविणे तसेच ग्राहकांना गुणवत्तापुर्ण माल मिळणे व पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व माहित होण्यासाठी या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते

 महोत्सावामध्ये एकूण ६१ स्टॉलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल जसे माण, खंडाळाची देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी, कराडची नाचणी, जावळी, पाटणचा इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मुग, कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता आले या माध्यमातून ३ दिवसांमध्ये २२ लाखापर्यंत विविध शेतमालाची विक्री झाली.

0000

संबंधित पोस्ट

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे आज वितरण

vishwatmaklokswamivarta

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध-पालकमंत्री शंभूराज देसाई*

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*