vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

 

सातारा प्रतिनिधी: राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

 पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अग्रीस्टॅग योजनेतंर्गत फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सोपान टोणपे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.

या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या योजनेमूळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येणार आहे.

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते;मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आयसीयूचे लोकार्पण,शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात

शासकीय अधिकाऱ्यांशी परस्पर समन्वयानेसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे-गतिमानता अभियानता उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण उत्साहात..