vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जालना प्रतिनिधी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 24 ऑक्टोबर व 25 ऑक्टोबर 2025 रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केला असुन, तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 26 ते 28 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

    मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शशीकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

दसरा मेळावा मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील रमाई आवास योजना समितीची ५ हजार ७०० घरकुलांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

कोकणवासियांना मोठा दिलासा- गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त तिकीट खिडक्या    खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर,प्रवासी संघटनेने मानले नरेश म्हस्के यांचे आभार  

भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा विचार जगाला तारणारा- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या सर्व भारतीयांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …