vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी..

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. जवळपास अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यघटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी दोन वेगवेगळी खंडपीठे (Constitution Bench) नेमण्यात आली आहे. ही खंडपीठे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. जवळपास अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यघटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी दोन वेगवेगळी खंडपीठे (Constitution Bench) नेमण्यात आली आहे. ही खंडपीठे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत. ज्यामुळे घटेनचा अर्थ लावण्याचे महत्त्वपूर्ण काम ही खंडपीठे करतील. प्रामुख्याने ईडब्ल्यूएस आरक्षणाची वैधता, मुस्लीम आरक्षण, मुस्लिमांमधील बहुविवाहपद्धती, निकाह हलाला आणि इतरही काही प्रकरणांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील संत्तासंघर्षाचे प्रकरणही घटनापीठाकडेच गेले आहे. परंतू, त्यावर आज बहुदा सुनावणी होणार नाही.

 

दोन घटनापीठांपैकी पहिल्या घटनापिठाचे नेतृत्व हे सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचीत न्यायमूर्ती यूयू ललित यांच्याकडे आहे. या खंडपीठात खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एसआर भट्ट, बेला माधुर्य त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या खंडपीठाचे नेतृत्व हे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याकडे असेल. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश आहे

 

देशातील एखाद्या राज्याचे विधिमंडळ अथवा संसद यांमध्ये जेव्हा घटनात्मक पेच निर्माण होतो तेव्हा प्रकरण न्यायालयात पोहोचते. न्यायालयातही काही प्रकरणांमध्ये यावर अनेक न्यायमूर्तींनी विचार करुन निर्णय घ्यावा असे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटते तेव्हा सर्वोच्च न्यायालय अशी प्रकरणे घटनापीठाकडे सोपवते.

संबंधित पोस्ट

द केरळा स्टोरी चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा…

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी रविवार, ०८ डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

vishwatmaklokswamivarta

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारेभारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन,महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला आमदार एकनाथ शिंदे यांचे उत्तर…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू