vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांची मोठी बातमी: मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत, दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलच्या रांगा

Central Railway : मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत, दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलच्या रांगा…

मुंबई प्रतिनिधी

सीएसटी कडे रेल्वे जाणाऱ्या लोकल रेल्वेचा प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी. सूचना मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे. यामुळे ऑफीसला पोहोचण्यासाठी मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच लेटमार्कचा फटका बसणार आहे.  माटुंगा  दादर , परेल दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने लोकलच्या रांगा लागल्या आहेत. गाड्यांचा खोळंबा हा तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

 

कामावर जाण्याच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. दादर येथे सिग्नलमध्ये काही बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक जलद गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. घाटकोपर ते कुर्ला दरम्यान, ही वाहतूक वळविण्यात आली आहे. तर सायनपासून दादरपर्यंत लोकल थांबत थांबत पुढे सकरत आहेत.  सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

कुर्ला ते दादर हे अंतर कापण्यासाठी 45 मिनिटे लागत आहेत. दादरनंतर सीएसटीकडे गाड्या सुरुळीत धावत आहेत. मात्र अप आणि डाऊन या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत.

संबंधित पोस्ट

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश**मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक*

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

9.02 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 ची परतफेड

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-आचारसंहिता कालावधीत जास्तीची रोख-रक्कम बाळगल्यास जप्तीची कारवाई

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना पुन्हा निवड देण्याचे आवाहन राष्ट्रवादी प्रमुख अजित पवार यांनी केले

vishwatmaklokswamivarta