vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विदर्भवासियांना मध्य रेल्वेकडून फेस्टीव्हल गिफ्ट, दिवाळी निमित्त चालवणार मुंबई नागपूर विशेष ट्रेन

विदर्भवासियांना मध्य रेल्वेकडून फेस्टीव्हल गिफ्ट, दिवाळी निमित्त चालवणार मुंबई नागपूर विशेष ट्रेन…

 

मुंबई रेल्वे प्रतिनिधी

मध्य रेल्वे कडून मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे.

विदर्भातील (Vidarbha) चाकरमान्यांसह मुंबईत (Mumbai) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळ (Yavatmal), अमरावती (Amravati) या भागातून मोठ्या संख्येन चाकरमानी मुंबईत (Mumbai) कामासाठी येतात पण सणासुदीच्या दरम्यान घरी जातात. तरी मुंबईतून विदर्भात जाणाऱ्या अगदीच बोटावर मोजता येईल एवढ्याच रेल्वेचे पर्याय आहे. एरवीचं घरी जायचं असल्यास महिन्यां आधिपासून तिकिट बूक (Ticket Booking) करावं लागतं. त्यात आता सणासूदीच्या दिवसांत तिकीट (Ticket) मिळण अशक्यचं. त्यात नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) अंतर अधिक असल्याने  रेल्वे हा सगळ्यात सोयिस्कर आणि किफायती मार्ग आहे. म्हणून जास्तीत जास्त विदर्भकर रेल्वे मार्गाला पसंती दाखवतात.

यासर्व बाबी लक्षात घेता मध्य रेल्वे (Central Railway) कडून मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस (Mumbai Nagpur Weekly Superfast Express) सुरु करण्यात आली आहे. नव्याने सुरु करण्यात आलेली ही ट्रेन (Train) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 22 ऑक्टोबरला आणि 29 ऑक्टोबर 2022 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता नागपूरला पोहोचेल. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या ट्रेनचा क्रमांक 01033 असा आहे. तसेच 01034 विशेष नागपूर-मुंबई ट्रेन साप्ताहिक सुपरफास्ट विशेषत: 23 आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूरवरुन दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. 

तरी या फेस्टीव्हल ट्रेनबाबत (Festival Train) सविस्तर माहिती हवी असल्यास https://www.irctc.co.in/nget/  या भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) अधिकृत वेबसाईटला (Website) भेट देत तुम्ही जाणून घेवू शकता. तसेच या फेस्टीव्हल रेल्वेच्या तिकीट बूकींला (Festival Railway Ticket Booking) सुरुवात झाली असुन तुम्ही ऑनलाईन (Online) किंवा थेट रेल्वे स्थाकावर जावून ही तिकीट बुक करु शकता

 

संबंधित पोस्ट

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात  – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील * कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शहाजीराजे भोसले स्मारकासाठी सुधारीत प्रस्ताव पाठवा- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

vishwatmaklokswamivarta

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta