
गोवरचा धोका वाढतोय! जाणून घ्या या संसर्गजन्य आजाराची लक्षणं आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती घ्याल काळजी!
आरोग्य प्रतिनिधी
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे.
कोरोना मधून जग सावरत असताना आता मुंबई मध्ये गोवरची साथ फोफावत आहे. लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा अधिक असल्याने सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. चिमुकल्यांना या संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासोबतच कोणती लक्षणं दिसल्यास तातडीने उपचार करावेत हे देखील जाणून घ्या.
3
पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे, यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाणून घेतली. #गोवर झालेल्या मुलांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांत आवश्यक औषधे ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणाचा वेग वाढविण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
#गोवर बाधितांचे सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.




