vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील घाटकोपर परिसरातील पारख रुग्णालय इमारतीला आग, अनेक रुग्ण अडकले

मुंबईतील घाटकोपर परिसरातील पारख रुग्णालय इमारतीला आग, अनेक रुग्ण अडकले…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील पारख रुग्णालय इमारतीला मोठी आग लागली आहे. प्राप्त माहितीनुसार, ही आग रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भडकली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसह व्हेटींलेटरवर असलेल्या रुग्णांना सुरक्षीत ठिकाणी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.

 

मुंबईतील पारख रुग्णालय (Fire breaks out in Ghatkopar) इमारतीला मोठी आग लागली आहे. प्राप्त माहितीनुसार, ही आग रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भडकली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसह व्हेटींलेटरवर असलेल्या रुग्णांना सुरक्षीत ठिकाणी पोहोचविण्याचे काम सुरु आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्याप त्याला यश येताना दिसत नाही.

 

रुग्णालयाला लागलेल्या आगीबद्दल एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मदत आणि बचाव कार्यासाठी रुग्ण जीवाच्या अकांताने विनवणी करत आहेत. वरच्या मजल्यावर अडकलेले रुग्ण हात दाखवून मदतीची विनवणी करत आहेत.

पारख रुग्णालयात भडकलेली आग इतकी भयानक आहे की, आगीमुळे आकाशात धुराचे लोट उसळताना पाहायला मिळत आहे. या धुरामुळे आणि धुराच्या लोटामुळे पारेख रुग्णालयाचा परिसर काहीसा अंधारुन गेला आहे. आगीचे नेमके कारण चौकशीअंतीच पुढे येणार असल्याने ते कळण्यासठी काही काळा थांबावे लागेल. दरम्यन, कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु असल्याने झालेल्या वित्तहानीबाबत माहिती मिळू शकली नाही

संबंधित पोस्ट

मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर अखेर संचित रजा मंजूर..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेत8 लाख 38 हजार 495 महिलांची झाली नोंदणी

जळगाव जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत डिजिटल चित्ररथास प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दाखविला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

उंच गणेशमूर्तींसाठी खोल कृत्रिम तलाव उभारण्याचे आदेश