vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार

.महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार

मुंबई प्रतिनिधी

गेले अनेक तुरुंगात वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अखेर १ वर्ष १ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर आज अनिल देशमुखांची अखेर सुटका होणार आहे. यामुळे कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण झालेला आहे

 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल देशमुखांना १०० कोटींच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अजूनही या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असुन १०० कोटींचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. तर काल कोर्टाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला असुन आज आर्थर रोड जेलमधून देशमुखांची सुटका होणार आहे. राष्ट्रवादी पक्षात आज उत्साहाचं वातावरण आहे. देशमुखांच्या सुटकेनंतर आर्थर रोड जेल ते सिध्दीविनायक मंदीर अशी रॅली काढण्यात येणार आहे. राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. कालचं अधिवेशनात एकमताने महाराष्ट्र-कर्नाटक सिमावाद कर्नाटक विरोधी उठाव विधान सभेत एकमताने मंजूर झाला. तरी आज देशमुखांच्या सुटकेचे अधिवेशनात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी  होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली असुन अखेर १ वर्ष १ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर आज अनिल देशमुखांची अखेर सुटका होणार आहे.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी  केला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली पण काल मात्र अनिल देशमुखांची जामीन मंजूर झाला असुन त्यांची आज सुटका होणार आहे

 

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात सरासरी 14.7 मि.मी. पाऊस

रेशीमरत्न 2023 पुरस्काराने बुलढाणा येथील शेतकरी सन्मानित

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दलित पँथरच्या अध्यक्षपदी डॉ. स्वप्रिल ढसाळच्या नेतृत्वाखाली पॅथरर्स जोमाने उतरणार…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta

मास्क कधीपर्यंत वापरावा लागणार, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले…

vishwatmaklokswamivarta