vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल 5वी, 8वी स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल mscepune.in वर जाहीर..

महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल 5वी, 8वी स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल mscepune.in वर जाहीर..

पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, 5वी चे 16,232 विद्यार्थी ((23.9%) पात्र आहेत. तर 8वीचे 12,939 विद्यार्थी (12.5%) विद्यार्थी पात्र आहेत. एकूण 29,171 विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप साठी पात्र ठरवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल (Maharashtra Scholarship Exam 2022 Final Result) काल 3 जानेवारी 2023 दिवशी जाहीर करण्यात आला आहे. 31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE Pune) या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना, शाळांना गुणपडताळणी आणि निकालाबाबत अन्य तांत्रिक आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता अखेर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. mscepune.in आणि mscepuppss.in वर तुम्हांला निकाल पाहता येणार आहे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, 5वी चे 16,232 विद्यार्थी ((23.9%) पात्र आहेत. तर 8वीचे 12,939 विद्यार्थी (12.5%) विद्यार्थी पात्र आहेत. एकूण 29,171 विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप साठी पात्र ठरवण्यात आलं आहे.

कसा पहाल शिष्यवृती परीक्षेचा निकाल ? 

    • mscepune.in किंवा mscepuppss.in वर क्लिक करा.

    • होम पेज वर रिझल्ट लिंक पहा.

    • आता नव्या विंडो मध्ये तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाका.

    • त्यानंतर विषयनिहाय तुम्ही निकाल पाहू शकाल.

दरम्यान या लिंक वर तुम्ही थेट स्कॉलरशीप निकाल पाहू शकाल.

अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आपला बैठक क्रमांक टाकून देखील अंतिम निकाल पाहू शकणार आहेत. सोबतच शाळांसाठी वेगळा निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये सविस्तर यादी देखील पाहता येणार आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक पाहण्यासाठी, ते डाऊनलोड करण्यासाठी गुणपत्रक, बॅंक खात्याची माहिती आणि आधार क्रमांक  ही माहिती देणं अत्यावश्यक आहे. गुणवत्तायादीमध्ये त्या विद्यार्थ्याचा संच प्रकार  पाहता येणार आहे.

संबंधित पोस्ट

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समितीमुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ७५ प्रतिनिधी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी होणार !

vishwatmaklokswamivarta

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

अभिनेता शाहरुख खान वर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई; महागडी घड्याळे बाळगल्याप्रकरणी ठोठावला 6.83 लाखांचा दंड

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

ठाणे परिसरात,लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते? भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र महाविकास आघाडीवर सरकारवर हल्ला, खुलासा करण्याची मागणी…