
महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल 5वी, 8वी स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल mscepune.in वर जाहीर..
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, 5वी चे 16,232 विद्यार्थी ((23.9%) पात्र आहेत. तर 8वीचे 12,939 विद्यार्थी (12.5%) विद्यार्थी पात्र आहेत. एकूण 29,171 विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप साठी पात्र ठरवण्यात आलं आहे.
महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल (Maharashtra Scholarship Exam 2022 Final Result) काल 3 जानेवारी 2023 दिवशी जाहीर करण्यात आला आहे. 31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE Pune) या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना, शाळांना गुणपडताळणी आणि निकालाबाबत अन्य तांत्रिक आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता अखेर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. mscepune.in आणि mscepuppss.in वर तुम्हांला निकाल पाहता येणार आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, 5वी चे 16,232 विद्यार्थी ((23.9%) पात्र आहेत. तर 8वीचे 12,939 विद्यार्थी (12.5%) विद्यार्थी पात्र आहेत. एकूण 29,171 विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप साठी पात्र ठरवण्यात आलं आहे.
कसा पहाल शिष्यवृती परीक्षेचा निकाल ?
-
- mscepune.in किंवा mscepuppss.in वर क्लिक करा.
-
- होम पेज वर रिझल्ट लिंक पहा.
-
- आता नव्या विंडो मध्ये तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाका.
-
- त्यानंतर विषयनिहाय तुम्ही निकाल पाहू शकाल.
दरम्यान या लिंक वर तुम्ही थेट स्कॉलरशीप निकाल पाहू शकाल.
अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आपला बैठक क्रमांक टाकून देखील अंतिम निकाल पाहू शकणार आहेत. सोबतच शाळांसाठी वेगळा निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये सविस्तर यादी देखील पाहता येणार आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक पाहण्यासाठी, ते डाऊनलोड करण्यासाठी गुणपत्रक, बॅंक खात्याची माहिती आणि आधार क्रमांक ही माहिती देणं अत्यावश्यक आहे. गुणवत्तायादीमध्ये त्या विद्यार्थ्याचा संच प्रकार पाहता येणार आहे.



