vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अहमदनगर जवळ साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर…

अहमदनगर जवळ साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर…

[ नगर प्रतिनिधी : अहमदनगर जवळ सिन्नर-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ( Accident News ) अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

अंबरनाथ, ठाणे परिसरातील 50 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. मात्र रस्त्यातच 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा चेहरा आणि धड वेगळे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. इतर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर, नाशिकमध्ये हलवण्यात आले आहे.

हा अपघात इतका भिषण होता की बसचा चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही बस मुंबईहून येत होती. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर अपघात झाला. या अपघात झाला असून यात 5 ते 6 जणांना मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित पोस्ट

तुर्कीमधील या भीषण नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी भारत सरकारने मदतीचा हात, श्वान पथकासह एनडीआरएफच्या जवानांची टीम शोध आणि बचाव कार्यासाठी तुर्कीला रवाना…

vishwatmaklokswamivarta

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली डोंबिवली स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

विकसित भारत-2047’ लक्ष्य साधण्यासाठी महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक…

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जोरदार पावसाची अपेक्षा महानगरपालिकेची पाणीकपात सुरूच राहणार.