vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अहमदनगर जवळ साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर…

अहमदनगर जवळ साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर…

[ नगर प्रतिनिधी : अहमदनगर जवळ सिन्नर-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ( Accident News ) अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

अंबरनाथ, ठाणे परिसरातील 50 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. मात्र रस्त्यातच 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा चेहरा आणि धड वेगळे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. इतर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर, नाशिकमध्ये हलवण्यात आले आहे.

हा अपघात इतका भिषण होता की बसचा चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही बस मुंबईहून येत होती. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर अपघात झाला. या अपघात झाला असून यात 5 ते 6 जणांना मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित पोस्ट

दि.30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान सर्वांनी मतदान करा !

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

सनबर्न’च्या माध्यमातून होणाऱ्या नशेखोरीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे झारीतील शुक्राचार्य शोधा !* – नशा विरोधी संघर्ष अभियानची मागणी 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

हॉटेल व्यवसाय हंगामावर चालतो. त्या हंगामातच व्यवसाय होणाऱ्या रात्री आठ ते अकरा या वेळेतच निर्बंध असतील, तर हॉटेल उघडण्यापूर्वीच बंद करायचे काय, असा प्रश्न आहे.”- गौरव चांडक, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन.

vishwatmaklokswamivarta